आखोदेखा हाल चीनमधील रक्तरंजित क्रांतीचा
आखोदेखा हाल चीनमधील रक्तरंजित क्रांतीचा
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन, उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
च्यु चाऊ हे अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील याॅर्क शहरातील याॅर्क काॅलेज आॅफ पेन्सिलव्हॅनिया मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १६ मे २०१६ ला वृत्तपत्रात बरोबर ५० वर्षांपूर्वी म्हणजे १६ मे १९६६ माओ त्से तुंग यांच्या आदेशानुसार झालेल्या रक्तरंजित क्रांतीचा इतिहास कथन केला आहे. ते स्वत: या क्रांतीचे साक्षीदार व भुक्तभोगी आहेत. त्यामुळे त्यांच्या कथनाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते.
क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे - त्यावेळी माझे वय जेमतेम ११/१२ वर्षे असेल. या क्रांतीचा प्रारंभ शुद्धिकरणाने(पर्जिंगने) झाला. शुद्धिकरणाच्या नावाखाली भडकलेल्या धगधगत्या ज्वाळात क्रांतीचे विरोधक भस्मसात होत होते आणि 'अंतिम सत्य' असलेल्या साम्यवादी तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना होत होती. माओची पहिली गर्जना सर्वत्र निनादत होती, ‘क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे’. हजारोंच्या संख्येत लालदूतांचा (रेड गार्ड्स) सर्वसंचार देशाच्या कानाकोपऱ्यात हैदोस घालीत होता. अल्पावधीत मुळच्या सत्ताधाऱ्यांशी असलेला भावी सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष समाज जीवनातील सर्व स्तरांपर्यंत पोचला. विनाश आणि हिंसा यांचे तांडव नृत्य सुरू झाले. ११/१२ वर्षांचा मी पार भेदरून गेलो होतो. तरीही आज ५० वर्षानंतर सुद्धा त्यावेळच्या आठवणी मला हादरून टाकतात. हे दु:स्वप्न माझी पाठ शेवटपर्यंत सोडणार नाही, असे वाटते.
'माओचा दुसरा आदेश, हिंसक व्हा' - लाल दूत/लाल सैनिक (रेड गार्ड्स)तसे पोरसवदाच होते. त्यांचे ब्रेन वाॅशिंग झालेले असल्यामुळे ते वयस्कांपेक्षा अधिकच कडवे झाले होते. हे गुंड कुणाच्याही घरात घुसत, कुणावरही हल्ला करीत, त्याचा मरेपर्यंत छळ करीत. हे सर्व क्रांतीच्या नावे सुरू होते. ‘हिंसक व्हा’, माओचा दुसरा आदेश विद्यार्थी दशेतील या लाल सैनिकांना होता. परिणामत: लवकरच विरोध मावळला. 'माओ म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे माओ' हे समीकरण दृढ झाले.
भेकड लाल सैनिक - ती १९६६ सालची काळरात्र होती. लाल सैनिक आमच्या वसतीत शिरले. ते बिनदिक्कत निरपराध्यांना धाक दाखवीत, घरातील चीजवस्तू धुंडाळीत, लूट करीत आणि दोषींची रस्त्यावरून धिंड काढीत. चहूकडून आक्रोश, आरोळ्या, किंचाळ्या, याचना याशिवाय दुसरे काहीही कानावर पडत नव्हते. लाल सैनिकांच्या दृष्टीने देशाचे तीन दुश्मन, म्हणजे मी, माझी बहीण आणि माझे वडील हे होतो. माझे वडील तर फार मोठे गुन्हेगार होते. खरेतर त्यांनी दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी गाजविली होती. चांग काई शेखच्या आधिपत्त्याखालील चीनच्या हवाई व्याघ्र ( फ्याईंग टायगर्स) ते एक बिनीचे शिलेदार होते. पण ते आता प्रतिक्रांतिवादी (काऊंटर रिव्होल्युशनरी) ठरले होते. त्यांची प्रकृती आता पार बिघडली होती. आजारी, विकलांग व असहाय्य अवस्थेत सुद्धा त्यांनी गनीमी काव्याने त्या पोरसवद्या गुंडांना चकवले. ते म्हणाले ‘बघा, मला क्षयरोगाची बाधा झाली असून तो पराकोटीचा संसर्गजन्य आहे. नंतर तुम्हाला काही झाले तर मला दोष देऊ नका’. त्यांचे हे शब्द कानावर पडले आणि परक्रमी लाल सैनिकांनी त्याच पावली पाय लावून पोबारा केला. खरेतर माओच्या लाल पुस्तकातील (रेड बुक) तिसरी शिकवण होती, ‘ कष्ट आणि मृत्यूची तमा बाळगू नका’.पण मृत्यूचा नुसता ओझरता उल्लेख सुद्धा त्यांना पळता भुई थोडी होण्यास पुरेसा ठरला. माझ्या वडलांनी त्या असहाय्य अवस्थेत असतांना सुद्धा त्या भेकडांना पळवले खरे पण ते मृत्यूला मात्र चुकवू शकले नाहीत. लवकरच ते गेले पण आम्ही शोक सुद्धा करू शकलो नाही. कारण ते एकेकाळचे शूर पायलट असले तरीआजचे ‘राज्याचे शत्रू’ होते ना!’
बहिणीचे दुर्भाग्य - प्राचार्या असलेल्या माझ्या बहिणीच्या वाट्याला मात्र हे भाग्य नव्हते. खरेतर ती लपून बसली होती. पण लाल सैनिकांनी तिला हुडकून काढले. गावातील सर्व शाळांच्या प्रमुखांची धिंड काढण्यात आली. शांघायच्या गल्लीबोळातून त्यांना फिरवण्यात आले. त्यांचा दोष काय, गुन्हा कोणता, याची साधी चौकशी करण्याचे सुद्धा कुणाला आवश्यक वाटले नाही. लाल सैनिकांची मूठ साधी मूठ नसे/नव्हती. ती वज्रमूठ(आयर्न फिस्ट) होती. तिचा तडाखा सर्व प्राचार्यांना सारखाच बसला.
चतुर आई - माझी आई मात्र चतुर ठरली. ती वेळीच सावध झाली. घरातील सर्व ‘आक्षेपार्ह’ पुस्तके, लिखाण, छायाचित्रे असा ‘गुन्हेगारी’ शाबित करील असा सर्व मुद्देमाल तिने अग्नीला अर्पण केला. त्यावेळचे तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव माझ्या डोळ्यासमोर आजही तरळतात. एकेक वस्तू अग्नीला अर्पण करण्यापूर्वी ती निरखून पहायची. मनाचा हिय्या करायची आणि ती वस्तू अग्नीच्या स्वाधीन करायची. अगोदर तिने सर्व दारे खिडक्या घट्ट बंद करून घेतल्या होत्या. पडदे ओढून घेतले होते. भस्मसात होणारे काही फोटो तर मी प्रथमच पहात होतो. जळण्यापूर्वी तो फोटो वाकडातिकडा व्हायचा, तेवढ्या काळात मी ते दृश्य नजरेत साठवून ठेवीत असे. काही फोटो माझ्या आईवडलांच्या लग्नातले होते. सैनिकी वेषातले माझे वडील राजबिंडे दिसत होते, आई तर सौंदर्यवती होती.
परकीय वकिलातींवर हल्ला - लाल सैनिकांचा मोर्चा आता परकीय देशांच्या वकिलातींकडे वळला.राजकीय अस्पृष्यांना हद्दपार करण्यात आले. काहींना तर जिवंत पुरण्यात आले. काहींनी मात्र अग आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारला होता.
जुनी जळमटे जाळा - याचवेळी दुसरी एक मोहीम हाती घेण्यात आली. ‘चार जुनी जळमटे जाळा’( डिस्ट्राॅय फोर ओल्ड्स कॅंपेन). जुन्या कल्पना, जुन्या सवयी, जुन्या चालीरीती व जुनी संस्कृती यांना मूठमाती देण्याची ही मोहीम होती. काही आठवड्यातच सर्व भस्मसात झाले. ५ हजार वर्षांचा चीनचा सांस्कृतिक वारसा क्षणार्धात आगीच्या भक्षस्थानी पडला, कधीही कुणाच्याही दृष्टीस न पडण्याच्या शक्यतेसह. हा केवळ चीनचा नव्हे तर मानवतेचा वारसा होता. कारण त्यात ग्रीक, रोमन, ख्रिस्तपूर्व व ख्रिस्तोत्तर वस्तू, संकेत, संबोध व संकल्पना सामावल्या होत्या.
तिबेटमधील मंदिरांचा विध्वंस - तिबेटमधील ९० टक्के मठ व मंदिरे भुईसपाट झाली. ७४ टक्के पुरातत्त्व वस्तू व वास्तू नष्ट झाल्या. कनफ्युशसचे जन्मस्थान आता जगाच्या नकाशात दिसणार नव्हते. खरे तर हे स्थान चीनचे जेरुसलेम होते. त्याचे व क्रांतीचे वावडे असण्याचे कारण नव्हते. सगळ्याचर्चेसमधून बायबलच्या प्रती शोधून शोधून गोळा करून त्यांचा ढिगारा रस्त्याच्या मधोमध सर्वांच्या दृष्टीला पडेल अशाप्रकारे ठेवून पेटवून देण्यात आला. धुरांच्या लोळांनी काळवंडलेले तेव्हाचे आकाश तेव्हाप्रमाणे अाजही मी पाहू शकतो.
आजचा चीन - आज माओ नाही, चीन एक बलाढ्य आर्थिक शक्ती झाली आहे. पण या सांस्कृतिक क्रांतीची धग आजही ठिकठिकाठी आणि ठायाठायी जाणवते, चटके देते. चीन बलाढ्य झालाय खरा पण त्याचा पाया भावशून्य व केवळ दोषच पाहण्याची वृत्ती(सिनिसिझम), सुखलोलुपता (हेडोनिझम), जडवाद (मटेरियालिझम), संधिसाधुपणा(आॅपर्च्युनिझम) व अज्ञान(इग्नरन्स) हा आहे, हे एक कटू सत्य आहे.
विरोधाभास - माओने देशाच्या धरोहराचा केवळ विनाशच केला नाही व संहारात हिटलर आणि स्टॅलीनलाही मागे टाकले असे नाही तर हे सर्व करूनही आज तो सामान्य चिनी नागरिकांचा मसीहा मानला जातो, ही मात्र अचंबित करणारी बाब आहे. पुढे रेड गार्ड्सचा (लाल सैनिक) धिक्कार करण्यात आला, त्यांना भरकटलेले (अॅबेरंट) ठरवून त्यांना दूषण देण्यात आले. विरोधाभासाचा भाग मात्र असा आहे की, आजही चिनी कम्युनिस्ट पक्षात भूतपूर्व रेड गार्ड्सची संख्या भरपूर आहेव ते प्रतिष्ठाप्राप्त आहेत.
आज चीनने तसे पाहिले तर साम्यवादापासून फारकत घेतली आहे.पण पक्षातील सदस्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. चिनी शासनाने भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडली आहे. पण पनामा पेपर्स(गैरमार्गाने पैसा साठवणाऱ्यांची यादी) चिनी राजकारणी व उद्योगपतींची नावे वरच्या क्रमांकावर आहेत. दलाई लामा बेकायदेशीर परागंदा( प्रोस्क्राईब्ड) गणले जात आहेत. या ठिकाणी आणखी एका विरोधाभासाचा उल्लेख करायला हवा. बुद्धधर्माची तिबेटी शाखा चीनमध्ये कधी नव्हे इतकी लोकप्रिय आहे.
देशत्यागासाठी धडपडणारे चिनी विद्यार्थी - चिनी शिक्षण पद्धतीचे गोडवे गात असले तरी मेधावी चिनी विद्यार्थी शिक्षणासाठी वाटेल त्या मार्गाने अमेरिकेकडे धाव घेत आहेत. क्रांतीकाळातील गाणी आजही चीनमध्ये गायली जात असली तरी क्रांतीच्या खुणा पार पुसल्या गेल्या आहेत. एक ग्रीक वाक्प्रचार आहे. एखाद्याला नष्ट करायचे असेल तर परमेश्वर त्याला अगोदर पागल करतो. चिनी क्रांती म्हणजे ७० दशलक्ष निर्दोष व्यक्त्तींचे शिरकाण होते.
दुसऱ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर चीन- आता चीन खऱ्याखुऱ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. लवकरच चीनमधून आजची जुलमी राजवट उलथून टाकली जाईल आणि लोकांच्या, लोकांसाठी व लोकांकरवी ( आॅफ दी पिपल, बाय दी पीपल अॅंड फाॅर दी पीपल) अशा राजवटीची मुहूर्तमेढ रोविली जाईल, अशी चिन्हे आहेत. अशा दिवसाची मी वाट पाहत आहे. त्या दिवशी बेस बाॅलची टीम घेऊन माझ्या जन्मगावी जाण्याचे मी ठरविले आहे, असे म्हणत च्यु चाऊ यांनी आपल्या लेखाचा समारोप केला आहे.
Sent from my iPad

Comments
Post a Comment