Posts

आखोदेखा हाल चीनमधील रक्तरंजित क्रांतीचा

आखोदेखा हाल चीनमधील रक्तरंजित क्रांतीचा वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन, उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?   च्यु चाऊ हे अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील याॅर्क शहरातील याॅर्क काॅलेज आॅफ पेन्सिलव्हॅनिया मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १६ मे २०१६ ला वृत्तपत्रात बरोबर ५० वर्षांपूर्वी म्हणजे १६ मे १९६६ माओ त्से तुंग यांच्या आदेशानुसार झालेल्या रक्तरंजित क्रांतीचा इतिहास कथन केला आहे. ते स्वत: या क्रांतीचे साक्षीदार व भुक्तभोगी आहेत. त्यामुळे त्यांच्या कथनाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते.  क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे -   त्यावेळी माझे वय जेमतेम ११/१२ वर्षे असेल. या क्रांतीचा प्रारंभ शुद्धिकरणाने(पर्जिंगने) झाला. शुद्धिकरणाच्या नावाखाली भडकलेल्या धगधगत्या ज्वाळात क्रांतीचे विरोधक भस्मसात होत होते आणि 'अंतिम सत्य' असलेल्या साम्यवादी तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना होत होती. माओची पहिली गर्जना सर्वत्र निनादत होती, ‘क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे’. ...

मुंगी उडाली आकाशी?

‘मुंगी उडाली आकाशी’ वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ‘मुंगी उडाली आकाशी’, असे खुद्द ज्ञानेश्वरांनीच म्हटले हे आपल्याला माहीत आहे. तसे पंख फुटलेल्या मुंग्या आपणही पाहिल्या आहेत. त्यांना उडतांना पाहणारे तुलनेने कमी असतील. ज्ञानेश्वरांनी मुंगीने सूर्याली गिळल्याचेही सांगितले आहे. नुकतीच एक मुंगी आकाशात उडाली आहे आणि ती एका बलाढ्य शक्तीच्या नजरेला नजर देऊन उभी आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. आणि तिचे हे कर्तृत्त्व कोणीही पाहू शकेल. कोण आहे ही मुंगी? कायआहे तिचे कर्तृत्त्व? सर्व हकीकत सुरवातीपासूनच पहावी, हे बरे.  दुसऱ्या महायुद्धानंतर माओ त्से तुंग यांच्या नेतृत्त्वाखालील चढाईत चांग काई शेख यांचा पाडाव झाला पण तायवान बेटावर मात्र त्यांची सत्ता अमेरिकेच्या कृपाप्रसादाने टिकून राहिली. आजतागायत ती तशीच टिकून आहे. यालाच रिपब्लिक आॅफ चायना. याचे सामर्थ्य एवढे चिमुकले आहे की, कम्युनिस्ट चीनने ठरवले तर हे बेट काबीज करायला क्षणाचाही वेळ ...

चीनचा चढेलपणा आणि भारताचा भोळसटपणा

चीनचा चढेलपणा आणि भारताचा भोळसटपणा                                   वसंत गणेश काणे हल्ली मुक्काम पुणे ९४२२८०४४३० या भूतलावर अनेक देश आहेत. हे मानवनिर्मित आहेत.देशोदेशींच्या सीमारेषा ईश्वराने आखून दिलेल्या नाहीत, त्या मानवनिर्मित आहेत. याचा प्रत्यय रशियाने नुकताच सर्व जगाला आणून दिला आहे. आता क्रिमीया रशियाचा भाग बनला आहे. अमेरिका आणि युरोपीय देश आरडाओरड करीत आहेत. त्यांची शक्ती वरचढ ठरली तर आणि तरच हा निर्णय उलटेल एरवी नाही. बळी तो कानपिळी!     कोंबडे झाकले पण ...        या सत्याची आठवण करून देणारी घटना नुकतीच घडली आहे. चीन बरोबर झालेल्या संघर्षात १९६२ साली आपल्याला याचा चांगलाच परिचय आला. या संघर्षात भारताचा पराभव का झाला, कोणाचे कुठे चुकले याचा आढावा घेण्यासाठी लेफ्टनंट जनरल हेन्डरसन ब्रूक्स यांनी एप्रिल १९६२ मध्ये सादर केलेला अहवाल आजतागायत गोपनीय म्हणून भारत सरकारने जाहीर केला नाही. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार घटना घडून गेल्यानंतर पन्नास वर्षानंतर असे अह्वाल प्रसि...

चीनचा ओबीओआर (वन रोड वन बेल्ट) व भारत

  चीनचा ओबीओआर (वन रोड वन बेल्ट) व भारत    भारताने ओबीओआर (वन रोड वन बेल्ट) च्या निमित्ताने बेजिंगमध्ये होत असलेल्या शिखर परिषदेत सहभागी न होण्याचे ठरवून एक अभूतपूर्व धाडसी निर्णय घेतला आहे. अतिशय झगमगाटात सुरू असलेल्या या परिषदेत चीनने या मार्गाचे गोडवे गाण्यात किंचितही कसर ठेवलेली नाही. आजच्या स्वरूपात या योजनेत भारताच्या व उपखंडातील इतरांच्या दृष्टीनेही अनेक त्रुटी आहेत. याशिवाय हा भाग अलाहिदा आहे की, चीनने भारताला कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, जसे, न्युक्लिअर सप्लाय ग्रुपची सदस्यता मिळू नये म्हणून , तसेच सुरक्षा समितीत स्थायी सदस्यत्व मिळू नये असे प्रयत्न  केले आहेत. मसूद अझर या अतिरेक्याला सुरक्षा समितीच्या करवी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे शक्य होऊ नये, अशी भूमिका घेतली. सतत पाकिस्थानची बाजू घेऊन भारताचा पाणउतारा करणे यात किंचिंतही कसर ठेवलेली नाही. त्यामुळे ज्यात चीनला स्वारस्य आहे अशा योजनांचा पाठपुरावा भारताने तरी का करावा? चीनचे वाटाघाटी करण्याचे खास तंत्र - भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (मिनिस्ट्री आॅफ एक्सटर्नल अफेअर्स) चीनचे वाटाघाटी करण...

चीन बदलेल का? कधी?

बीजिंग ही चीनची राजधानी. एकेकाळी संपूर्ण शहराभोवती संरक्षक भिंत होती. पण, शहराचा विस्तार जसजसा होत गेला, तसतशी भिंतीची अडचण होऊ लागली. आज त्याच जागी शहराला गवसणी घालणारा रिंग रोड आहे. तो किती काळ टिकतो हे पाहायचे. हाय या मुख्य नदीला तीनतीन उपनद्या मिळतात. पण तरी पाण्याचा तुटवडा. म्हणून यांगसी नदीचे काही पाणी वळवून ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न झाला. जुनी राजवट जाऊन साम्यवादी राजवट आली. हिची पकड कायम राहावी आणि जगाला काय चालले आहे, ते कळू नये, म्हणून उभारलेला गुप्ततेचा पडदा बांबू कर्टन म्हणून ओळखला जातो. याची पकड खिळखिळी व्हावी म्हणून सतत प्रयत्न होत आहेत, लढे लढले जात आहेत. हे लढे केव्हा व कसे यशस्वी होतील, ते सांगणे कठीण आहे. त्यापैकी एका लढ्याची ही कहाणी. लढवय्या पू झिकियांग : या कहाणीचा नायक आहे पू झिकियांग. कोण आहे हा पू झिकियांग? हा आहे एक लढवय्या. याच्या लढ्याचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. प्राप्त परिस्थितीनुसार लढ्याचे स्वरूप कसे बदलते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पू झिकियांग यांना अडकवण्याचे आजवर तीन जोरदार प्रयत्न झाले. तिसर्‍या वेळी त्यांना दोषी ठरवण्यात आले. राष्ट्राच्या एका...

भारत व चीनचे संबंध

मुत्सद्देगिरी कोमिंगटॉंग या चीनच्या सत्ताधारी राष्ट्रीय पक्षाचे नेते चँग-काई-शेख यांची सत्ता माओ-त्से-तुंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट फौजांनी पूर्णत: उलथली (१९४८-१९४९) व एका सरंजामशाहीचा शेवट झाला. त्यामुळे आता चीनमधील अंतर्गत परिस्थिती सुधारेल व चिनी जनतेला सुखासमाधानाचे दिवस येतील, या भोळसट समजुतीला अनुसरून आपण चीनला केवळ मान्यताच दिली नाही, तर संयुक्त राष्ट्रसंघात जुन्या राष्ट्रवादी चीनच्या सुरक्षा परिषदेच्या वाट्याची जागा कम्युनिस्ट चीनला मिळावी, असा आग्रह आपण कम्युनिस्ट चीनकडून फारशी आग्रहाची विनंती नसतानाही केला. ही जागा साध्यासुध्या सदस्याची नव्हती, तर नकाराधिकाराचा (व्हेटोचा) अधिकार असलेल्या महाशक्तीची होती! तरीही भारताने चीनसाठी एवढा आग्रह केला. चीनची पाठराखण चीनवर खरी सत्ता कम्युनिस्ट पक्षाने मिळवल्यानंतर सुरक्षा समितीमधील राष्ट्रवादी चीनची जागा या नवीन सत्तेला मिळावी म्हणून या कम्युनिस्ट चीनची बाजू मनापासून आणि कंठरवाने कुणी मांडली असेल तर ती आपण. काही राजकीय निरीक्षकांचे मत तर असे होते की, रशिया स्वत: कम्युनिस्ट असूनही याबाबत फारसा उत्साह न दाखवता ‘मम’ म्हणून गप्...

बेल्ट चीनचे तर मार्ग भारताचे

  बेल्ट चीनचे तर मार्ग भारताचे वसंत गणेश काणे, बी एस्सी; एम ए (मानसशास्त्र); एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?    संपर्क व सहकार्य  हे दोन प्रमुख उद्देश स्पष्ट शब्दात मांडून चीनने आज या दोन्ही क्षेत्राबाबत आग्रही भूमिका घेतलेली आहे. अशी भूमिका अमेरिका व रशिया ह्या दोन महासत्ताही मांडू शकल्या असत्या. पण त्यांनी या शब्दात व या पद्धतीने मांडल्या नाहीत. आज जरी एवढी क्षमता नसली तरी भविष्यात ज्या देशात ही क्षमता निर्माण होऊ शकेल असे आणखी दोन देश या भूतलावर आहेत. एक आहे संयुक्त युरोप (युरोपियन युनियन) व दुसरा देश आहे भारत.   आत्मकेंद्री होण्याकडे बड्यांची वाटचाल? - अमेरिका मंदी, बेरोजगारी या दोन प्रमुख कारणास्तव सध्यातरी अंतर्मुख होऊन स्वत:पुरतेच पाहण्याच्या भूमिकेत आहे. अमेरिका फर्स्ट या भूमिकेचा अर्थच मुळी स्वकेंद्रित होण्याचा मार्ग चोखाळणे असा होतो. रशियन साम्राज्याचे तुकडे गोर्बोचेव्ह यांच्या कार्यकाळात झाले व या तुकड्यांना जणू तुम्ही यापुढे आपल्या प...