आखोदेखा हाल चीनमधील रक्तरंजित क्रांतीचा
आखोदेखा हाल चीनमधील रक्तरंजित क्रांतीचा वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन, उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? च्यु चाऊ हे अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील याॅर्क शहरातील याॅर्क काॅलेज आॅफ पेन्सिलव्हॅनिया मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १६ मे २०१६ ला वृत्तपत्रात बरोबर ५० वर्षांपूर्वी म्हणजे १६ मे १९६६ माओ त्से तुंग यांच्या आदेशानुसार झालेल्या रक्तरंजित क्रांतीचा इतिहास कथन केला आहे. ते स्वत: या क्रांतीचे साक्षीदार व भुक्तभोगी आहेत. त्यामुळे त्यांच्या कथनाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे - त्यावेळी माझे वय जेमतेम ११/१२ वर्षे असेल. या क्रांतीचा प्रारंभ शुद्धिकरणाने(पर्जिंगने) झाला. शुद्धिकरणाच्या नावाखाली भडकलेल्या धगधगत्या ज्वाळात क्रांतीचे विरोधक भस्मसात होत होते आणि 'अंतिम सत्य' असलेल्या साम्यवादी तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना होत होती. माओची पहिली गर्जना सर्वत्र निनादत होती, ‘क्रांती म्हणजे डिनर पार्टी नव्हे’. ...